डॉ. प्रकाश आमटे यांची प्रथमच दारूबंदी बद्दल भूमिका.
Bhairav Diwase. Oct 09, 2020
चंद्रपूर/ गडचिरोली:- चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारूबंदीबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याबाबत हालचालीं सुरु झाल्या आहे. आपत्ती व्यवस्थापन तथा बहुजन कल्याण तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असताना जनतेच्या हितासाठी दारूबंदी असणे आवश्यक आहे. दारूबंदीला माझे समर्थन असून राज्य सरकारने चंद्रपूर व गडचिरोली या दोनही जिल्ह्यामध्ये दारू बंदी कायम ठेवावी. अशी मागणी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.