ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथे सकाळी 8 वाजताची घटना.
ब्रम्हपुरी:- गळफास लावून इसमाने आत्महत्या केल्याची उघडकीस आली आहे. मृतक इसमाचे नाव देवानंद गोवर्धन राऊत ( 40 ) रा. अर्हेरनवरगाव ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून, सदर घटना जवळपास सकाळी 8 वाजता घडली. देवानंद ने आत्महत्या करण्याच कारण काय? असा प्रश्न गावकऱ्यांना पळला आहे.
देवानंद च्या पाठीमागे त्याची पत्नी व दोन मुलं आई-वडील तसेच एक लहान भाऊ अंकुश राऊत इतका परिवार आहे. देवानंद च्या आत्महत्येने गाव शोककाळात बुडाला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत .