राजस्थान रॉयल्सच्या विजयापेक्षा रियान परागच्या "त्या" ' VIDEO ची सगळेकडे चर्चा.

Bhairav Diwase
डान्सनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ झाला व्हायरल.
Bhairav Diwase. Oct 12, 2020


UAE मध्ये सुरु असलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 5 विकेटनी पराभव केला. सलग चार पराभवांनंतर विजयच्या प्रतीक्षेत असलेल्या राजस्थानच्या संघाने या सामन्यात 159 धावांचा यशस्वी पाठलाग केला. राजस्थाननं सुरुवातीला आपल्या महत्त्वाच्या विकेट गमावल्या. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या रियान पराग (Riyan Parag) आणि राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. या सामन्यात 159 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था 78 धावांवर 5 बाद झाली होती.

या सगळ्यात संघाच्या विजयापेक्षा लक्षणीय ठरला तो रियन परागचा शानदार डान्स. शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर परागने आसामचा पारंपरिक बिहू डान्स करत विजय साजरा केला. त्याच्या या डान्सनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत.