बल्लारपूर शहरात महाराष्ट्र सरकार विरोधात निषेध आंदोलन संपन्न..

Bhairav Diwase
महिलाओं के सन्मान में भाजपा मैदान मे.
 Bhairav Diwase. Oct 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विनायक कोसरे, बल्लारपूर


बल्लारपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीर  भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, बल्लारपूर नगर परिषद अध्यक्ष हरीशजी शर्मा व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेणूकाताई दुधे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरामध्ये महाराष्ट्रात महिलांच्या रक्षणात अपयशी ठरलेल्या तीघाडी सरकारचा निषेध करण्यात आला बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौक पासून ते तहसील कार्यालय पर्यंत भाजपा, महिला आघाडी व युवा मोर्चाच्या समस्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पैदल मोर्चा काढून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला व तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.


यावेळी भाजपा बल्लारपूर शहराध्यक्ष काशिनाथ सिंहजी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष राजू भैया दारी, ज्येष्ठ नेते शिवचन्दजी द्विवेदी, ज्येष्ठ नेते निलेशजी खरबडे, ज्येष्ठ नेते समीरजी केणे, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशालीताई जोशी, भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिष देवतळे, नगरपरिषद उपाध्यक्ष मीनाताई चौधरी,महिला आघाडी शहर महामंत्री कांताताई ढोके,नगरसेविका आशाताई संगिडवार, नगरसेविका सुवर्णाताई भटारकर, नगरसेविका जयश्रीताई मोहूरले, वर्षाताई सुंचूवार, आरतीताई आक्केवार, नगरसेवक स्वामी रायबरम, भाजयुमो शहर महामंत्री घनश्याम बुरडकर, सतीश कनकम,सलीम नबी अहेमद, बबलू अन्सारी, करीम भाई, प्रमोद रामिल्ला, प्रभुदिप सचदेवा, बबलू गुप्ता तसेच मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.