काँग्रेसच रूप उघड; दबंगगिरी थांबवा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना येथील अल्पसंख्यांक समाजाचे व महाराष्ट्र न्यूज-24 संपादक मोहब्बत खान यांना काँग्रेसचे विजय बावणे यांनी भ्रमणध्वनीवर अव्वाच्य शब्दात (तेरे घर मे घुस के मारुंगा) म्हणत क्षणभरातच विजय बावणे व त्याचे समर्थक दिनांक 18 नोव्हेंबर रोजी साडे अकरा दरम्यान सात ते आठ समर्थक घेऊन मोहब्बत यांच्या घरात घुसले.
हेही वाचा:- विजय बावणे सह समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला.
हेही वाचा:- हेही वाचा:- CDCC बँकेचे संचालक नगरपंचायत कोरपना चे स्वीकृत सदस्य विजय बावणे यांची पोलीस ठाण्यात च दादागिरी व शिवीगाळ.
काही न विचारता शिवीगाळ करून मारपीट करू लागले. त्यावेळी धावून गेलेल्या मोहब्बत यांची बहीण अंजुम, म्हाताऱ्या आईला ओढतान करून ढकलून पाडले. ही काँग्रेसची दबंगगिरी अल्पसंख्यांक विरोधी या घटनेवरून दिसून आले. हा प्रकार थांबला नाही तर आपल्या पद्धतीने योग्य चौक उत्तर दिल्या जाईल. असा इशारा एम आय एम चे शौकत अली टिपू सुलतान फाऊंडेशनचे शहाबाज अली अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद बैग यांनी दिला आहे. यामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून विजय बावणे यांची मुजोरी व मन मनमानी कारभाराला वरिष्ठ नेत्यांनी आवर घालावा असा इशारा आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा खणखणीत इशारा पत्रकारपरिषदेत दिला आहे.

