विजय बावणे सह समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला.

Bhairav Diwase
दोषींवर कडक कारवाई करण्याची तालुका पत्रकार संघाने केली मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना येथील CDCC, बँकेचे संचालक नगरपंचायती स्वीकृत सदस्य विजय बावणे, नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायत चे उपाध्यक्ष मनोहर चेन्न, स्वप्निल गाभणे, पियुष कावळे इत्यादी महाराष्ट्र 24 न्यूज चे संस्थापक यांनी नगरपंचायत कोरपना जनादेश 2020- 2021 या ग्रुप वर विजय बावणे यांच्या समर्थकांनी कोरपना येथील लोकप्रतिनिधीच्या बाबतीत टिकात्मत व निदनीय लेख लिहून दिनांक 16/11/ 2020 ला ग्रुप वर चाट केला यांचे प्रतिउत्तर म्हणून नगरपंचायत चे गैरव्यवहार व भोंगळ कारभार यांच्यावर लेख लिहिता यासाठी भ्रमण ध्वनी वरून मोहब्बत खान यांना अवकात व मारपीट करण्याची धमकी देऊन वरील समर्थक सह मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारपीट केली व बहीण मिनाज अंजुम यांचे हात ओढून आईला धमक्या मारून खाली पाडले. आरडा ओरड झाल्याने घरा पलीकडले लोक जमा झाले तेव्हा आपल्या समर्थकांसह पळ काढला तेव्हा मोहब्बत खान हे पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल करीत असताना. 

हेही वाचा:- CDCC बँकेचे संचालक नगरपंचायत कोरपना चे स्वीकृत सदस्य विजय बावणे यांची पोलीस ठाण्यात च दादागिरी व शिवीगाळ. 

आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून मोहब्बत यांना संरक्षण दिले पोलिसांनी अ . प्र. क्र.०२६४. कलम भा. द. वी. 147, 148, 149, 506, 507, 294, 332, 452, अन्वये गुन्हा दाखल केला प्रयत्नामुळे मोहब्बत खान यांचा परिवार भयभीत झाला असून याची दखल तालुका पत्रकार संघाने घटनेचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.