संदीप जोशी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे:- खासदार अशोक नेते.

Bhairav Diwase
पदवीधर मतदानाची टक्केवारी वाढविणे ही प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी:-आ.बंटीभाऊ भांगडीया.

नागभीड येथील पदवीधर मतदार सवांद कार्यक्रम.
Bhairav Diwase. Nov 18, 2020
नागभीड:- नागपूर पदवीधर मतदार संघ गेल्या 50 वर्षांपासून भाजपचा गड आहे या क्षेत्रातून पदवीधराची कामे करीत जनतेची कामे केली आहे कोरोना काळात जगात 5 टक्के मृत्यू दर असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या कुशलतेने आवश्यक वेळी लॉकडाऊन केल्याने आपल्या देशात 0.६ टक्के आहे उमेदवार संदीप जोशी यांनी सुद्धा अन्नछत्र उपक्रम राबवून जनतेच्या मदतीसाठी धावणारा उमेदवार आहे अन्नछञ उपक्रम योजना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सुद्धा राबविल्याचा प्रत्यक्ष मी साक्षदार असल्याचे सांगत खासदार अशोक नेते यांनी महाविकास आघाडी सरकार वर टीका करीत राज्य शासनाने तोकडी मदत दिल्याची टीका केली संदीप जोशी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
  सहा खासदार व 33 आमदार असलेला हा पदवीधर मतदार संघ असून 2 लक्ष 8 हजार मतदार असल्याने प्रत्येक मतदार पर्यत पोहचण्यासाठी कठीण असताना ही भाजपचे कार्यकर्ते मुळे पोहचू शकतो कोरोना काळात अन्नछत्र पुरवठा करण्याचे काम भाजप ने केले आहे महाविकास आघाडी शासनाने कोरोना काळातील वीज जोडणी कपात करण्याचे काम करीत आहे तेव्हा शेतकरी ,शिक्षक ,बेरोजगारी चे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करायचे आहे. भाजप मधून विविध पदा ची जबाबदारी सांभाळीत जनतेची कामे करणारा सामान्य कार्यकर्ता असून भाजपचा गड कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकसंघ राहण्याची विनंती भाजपचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी केली.
पदवीधर मतदार संघ च्या निवडणूक प्रचारर्थ मतदार संवाद नागभीड येथील कार्यक्रम प्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते . यावेळी उमेदवार खासदार अशोक नेते भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने संदीप जोशी ,वसंत वारजूकर, डॉ श्यामजी हटवादे, भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले , माजी जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपूरे, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष जीवतोडे ,जिल्हा महामंत्री कृष्णा सहारे, शिक्षक आघाडी अध्यक्ष गुरुदास कामडी,जीप सदस्य रुपाली मेश्राम नागभीड नप नगराध्यक्ष प्रा हिरे ,दिगंबर गुरपुडे माजी जीप सदस्य ईश्वर मेश्राम आदी उपस्थित होते . 

                यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की जिल्ह्यातील 35 हजार मतदान असून सर्वात जास्त मताची टक्केवारी वाढवायची आहे. कोणीही कितीही समाजाची भीती दाखवीत असले तरी काळजी करू नये सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र शेतकरी वर्गाकडे दूर्लक्ष करीत आहे नागभीड तालुक्यात 30 हजार हेकटर शेती असताना रोगांना पीक होणार नाही अशी भीती शेतकऱ्यांत असताना मात्र शासन दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात वीज बिल माफ केले नाही .राज्य शासनाने चुकीचे निर्णय घेऊन जनतेकडे पाठ फिरवीत आहे हेच समजवून सांगायचे आहे. एकत्रित येऊन संदीप जोशी विजयी करण्यासाठी आपल्याला पुढे येण्याचे आवाहन केले*
     भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या राजकीय कारकीर्द चा यशस्वी अहवाल सांगत नागभीड तालुक्यातील 2362 मतदारांचे वाचन करून एका पदाधिकाऱ्यांनी 20 मतदारांचे दायित्व घ्यायचे आहे .
     या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढवायची आहे.मतदारांशी सर्वात जास्त संपर्क करून निवडणूक जिंकायची आहे.सवांद साधत असताना केंद्राच्या जनहितकारी योजनांची माहिती सांगून राज्यातील महाविकास आघाडी शासनाने एकही योजना सुरू केली नाही हेही सांगायचे आहे .वीज बिल माफ,कर्जमाफी यावर विस्तृत माहिती देत उमेदवार संदीप जोशी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
संचालन भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके व आभार गणेश तर्वेकर यांनी केले. 
नप उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,नप बांधकाम सभापती सचिन आकुलवार आदीनी सवांद कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले.