प्रहारचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुख यांची बैठक संपन्न.

Bhairav Diwase
03 जानेवारीला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत भव्य आंदोलन.

कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे:- ना. बच्चू कडू
Bhairav Diwase. Nov 19, 2020


नागपूर:- काल नागपूर येथे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ६ जिल्ह्यातील प्रहार जिल्हा प्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुख यांची महत्वाची बैठक ना. बच्चू भाऊ कडू यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.  येत्या ३ जानेवारी ला क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथील दाभाडी येथे प्रहार तर्फे शेतकऱ्यांचा विविध मागण्यांवर नियोजित भव्य आंदोलनाचा नियोजनावर चर्चा करण्यात आली.


१) धान खरेदी केंद्र, बोनस, कापूस, तुर, गहू या पिकांचा हमी भाव, पीक विमा  व त्यातील त्रुटी व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान.

२) मागील वर्षी पासून बंद असलेली  कृषी पंप जोडणी त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यास होणारा त्रास.

३) केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेत निधी मिळत नसल्याने रखडलेली घरकुलाचे कामे.

४) लॉक डाऊन काळात आलेली मोठया प्रमाणावर वीज बिले.

५) केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे /धोरण यातील त्रुटी व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान.

      यासह अनेक विषयांवर सरकार ला वारंवार पाठपुरावा करून सुधा  समाधान कारक तोडगा न निघाल्याने प्रहार तर्फे भव्य आंदोलनाचा पवित्रा प्रहार नी घेतला आहे या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे अशी माहिती बच्चू भाऊ कडू यांनी दिली