(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील जंगल भागातील आदिवासी गावात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन विकास मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आदिवासींना दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या सोबत दिवाळी सण साजरा केला. तसेच कॅन्सरग्रस्त, दुर्धर आजारी, मृत्यू पावलेल्या कुटुंबाना मदतीचे वाटपही केले. आदिवासींनीही ढोलताशांच्या गजरात मंत्री वडेट्टीवार यांचे स्वागत केले.
ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील चारगाव, भारपायली, मानकापूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी भाऊबीजेची ओवाळणी केली. जनतेला संबोधित करतांना “आपल्याला या पदापर्यंत पोहचविणाऱ्या बहिनीमध्ये दिवाळी व भाऊबीज साजरा करण्याचा आनंद नेहमी स्मरणात राहील व भाऊ म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी राहीन” असे प्रतिपादन केले. यावेळी नेहमीप्रमाणे कॅन्सरग्रस्त, दुर्धर आजारी रुग्ण, मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत केली. त्या भागातील चकमानकापूर, मेटेगाव, सादागड, हेटी, सिंगापूर या गावात मिठाई पोहचविले. अशा उपक्रमातून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या व्यस्त कामातून आदिवासीच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष यशवंत बोरकुटे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राकेश गडमवार, सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दुवावार, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहूर्ले, आत्मा समितीचे अध्यक्ष नरेंद्र तांगडे, बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे, भास्कर आकारपवार, अतुल येलट्टीवार, सुनील पाल, महादेव कुमरे, श्रीकांत बहिरवार उपस्थित होते.



