किसान जिनिंग एन्ड प्रेसिंग मध्ये १९ नोव्हेम्बर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शेतकरी आधारभूत किमतीसाठी आपला कापूस 'सीसीआयला' देतात. सीसीआय द्वारे कापूस खरेदी केव्हा होणार याची वाट कापूस उत्पादक शेतकरी आतुरतेने बघत असतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आसिफाबाद महामार्गावरील किसान जिनिंग एन्ड प्रेसिंग मध्ये १९ नोव्हेम्बर पासून भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) द्वारे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांनी सीसीआयत कापूस विक्री करिता बाजार समितीत नोंदणी केलेली आहे त्यांनी कापूस या केंद्रावर विक्रीकरिता आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी बाजार समितीने ठरवुन दिलेल्या अटी/शर्ती चे पालन करावे व बाजार समिती मध्ये आपले नाव नोंदवावे अशीही विनंती करण्यात आली आहे.
⭕सीसीआय चे कापुस खरेदी केंद्रावर फक्त Fair Average Quality (F.A.Q.) दर्जाता कापुस खरेदी करण्यात येईल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
⭕F.A.Q. दर्जाचा कापुस जसल्यास शेतकऱ्यांची गाडी परत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
⭕शेतकऱ्यांने यापूर्वी सीसीआय मध्ये कापुस विक्री केला असेल, तर ते कळविणे बंधकारक आहे पुळे ऑनलाईन मध्ये तसे आळळुण आल्यास वा त्यामुळे पेमेंट होण्यास विलंब झाल्यास बाजार समिती जबाबदार राहणार नाही.
कापुस शेतमाल विक्री करिता आणण्यापूर्वी आपले नावे नोंदणी करणे आवश्यक आहे.
⭕कापुस शेतमालाची नोंदणी करण्याकरिता आधारकार्ड पासबुक, आणि सातबारा (सातबाऱ्यावर कापसाची नोंद असणे आसश्यक आहे.)
⭕नोंदणी केल्याशिवाय आपला शेतमाल स्विकारल्या जाणार नाही.
⭕नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवानी बाजार समितीने ठरवुन दिलेल्या तारखेलाच शेतमाल विकी करिता आणावा.