अचानक ओबी फॉल झाल्याने कोट्यावधी रुपयांच्या 3 ड्रिल मशीन रेतीच्या ढिगाऱ्याखाली.
चंद्रपूर:- आज वेकोलीच्या पद्मापूर येथील खुल्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना होता होता टळली.
दुपारच्या सुमारास ओबी फॉल झाल्याने कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या 3 ड्रिल मशीन रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या.
कामगारांची जेवणाची सुट्टी असल्याने कुणीही कामगार त्या मशिनजवळ उपस्थित नव्हते, दुर्घटना घडली त्यावेळी कामगार असते तर आज 6 ते 7 कामगारांचा जीव गेला असता.
वेकोली अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणाचे हे जिवंत उदाहरण आहे, खाणीत कुठे काय सुरू आहे यावर अधिकारी नेहमीच दुर्लक्ष देत असतात, फक्त सुरक्षा सप्ताह आला की आम्ही किती सुरक्षितता बाळगतो यावर जास्त भर हे अधिकारी देत असतात मात्र कामगारांच्या जीवाची पर्वा या अधिकाऱ्यांना मुळीच नाही.
वेकोली खदान मध्ये मॅनपावर कमी असल्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात परंतु हा मॅनपावर काबर कमी आहे याच्या आपण जर विचार केला तर युनियन लीडर व राजकीय पक्षाचे पदाधिकारी ड्युटी वरती हजेरी लावून घरी परत चालले जातात आणि गावभर देशसेवेच्या गप्पा हाणत असतात अशा या कामचुकार नेत्यांमुळे वेकोलिचे फार मोठे नुकसान होत आहे अशा या कामचुकार मी त्यामुळे वेकोली खदान मध्ये चार माणसांचे काम दोन माणसाच्या खांद्यावरती असते त्यामुळे अशा घटना घडत असतात आता क्षेत्रीय महाप्रबंधक यांनी या विकोली खदानी तील कामचुकार राजकीय पक्षांच्या पुढार्यांवर कारवाई करायला हवी.