ईवान संस्थेचे आयोजन, कोव्हीड जनजागृतीचा संदेश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- ईवान बहुद्देशीय संस्थेतर्फे बिबी येथे दिवाळीनिमित्त रांगोळी व मेहंदी स्पर्धा पार पडली. करोना जनजागृतीचा संदेश देणाऱ्या रांगोळी व मेहंदी स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळीनिमित्त गावात स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली.
रांगोळी व मेहंदी स्पर्धेतून महिलांनी अनेक सामजिक प्रश्नांना वाचा फोडली. स्त्री भ्रूण हत्या, फटाकेमुक्तीचा संकल्प, ग्राम स्वच्छता, प्रदूषणमुक्ती, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर महिलांनी रांगोळी व मेहंदी काढली. गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम गायत्री मोरे, द्वितीय स्नेहा काकडे, तृतीय पूजा घुगुल व प्रोत्साहनपर पारितोषिक केशरी गिरटकर, मोनिका खोंड, स्वाती देरकर, स्वाती कोडापे, अस्मिता पिंपळकर, प्रणित मोहितकर, शारदा मोहजे यांनी पटकावले. मेहंदी स्पर्धेत प्रथम गायत्री राणे, द्वितीय सुहाना शेख तर तृतीय पल्लवी सोनुले यांनी पारितोषिक पटकावले. २७८ महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण जया कापटे, सिमरन शेख, पूजा खोके, कविता कोरांगे, शकीला शेख, सुधा मोरे, निर्मला गिरडकर, शुभांगी हंसकर, तिखट यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आमदार वामनराव चटप, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, पं.स.सदस्य सविता काळे, ईवान संस्थेचे अध्यक्ष संतोष उपरे, स्नेहल उपरे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरज लेडांगे तर आभार गायत्री मोरे यांनी मानले. सेवार्थ गृप, शिवराजे मंडळ, सेव्हन स्टार स्पोर्टींग क्लबच्या युवकांनी आयोजनाकरिता सहकार्य केले.