मित्रांनो...... कॅन्सर ग्रस्त साईनाथला मदतीचा हात द्या.

Bhairav Diwase

मु. पो गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील श्री साईनाथ घुलाराम झुंगरे कॅन्सरग्रस्त रुग्णांच नाव.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी

गोंडपिपरी:- मु. पो गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील श्री साईनाथ घुलाराम झुंगरे यांना तोंडाचा कॅन्सर आजार झाला. या रोगावर मात करण्यासाठी सेवाग्राम सावंगी येथे एका शासकीय योजनेतून उपचार करण्यासाठी कुटुंबीय  दि.०४-११-२०२० ला उपचारासाठी सेवाग्राम ला रवाना होणार आहेत. साईनाथ हे भूमिहीन असून हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची आर्थिक परिस्थिती आहे. प्राथमिक खर्च ये जा करण्याकरिता किव्हा अन्य खर्च करण्यास असक्षम आहे. करिता फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुकाराम झाडे, पत्रकार संदिप रायपुरे, पं स सदस्य मनीष वासमवार, नगरसेवक राकेश पुन, यंग ब्रिगेड चे सुरज माडुरवार, दिनकर सोनटक्के, रवींद्र कोसरे, योगराज सोनटक्के, रवी बावणे, संतोष वनकर, अमोल पाल, रामदास कोसरे, विजय चिलनकर, बंडू चिलनकर यांच्याकडून 6500 ची आर्थिक मदत आज करण्यात आली.

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपलंही काही देणं लागत या माणुसकीच्या भावनेने आपण सुद्धा जमेल ती थोडी मदत त्यांना त्यांच्या अकाउंट पैसे पाठवून करावी ही विनंती...

सौ.मंगला साईनाथ झुंगरे

IFSC COD:- BKID0009605

A/c number 960510110005633

bank of india