Click Here...👇👇👇

वासेरा येथील युवकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- अॅड.पारोमिता गोस्वामी आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वासेरा येथील युवकांनी आज दिनांक 3/11/2020 रोज मंगळवारला आम आदमी पार्टीत प्रवेश केला. या वेळी सिदेवाही तालुका अध्यक्ष,शशिकांत बतकमवार, उपाध्यक्ष सुनील घाटे, जिल्हा युवा अध्यक्ष,गौरव शामकुले, तालुका संघटक शांताराम आदे, सूर्यवंशी लांजेवार, लोंढे, आदि उपस्थित होते,
पक्ष प्रवेश करणारे विकास पेंदाम,त्रिदेव उईके, प्रधुण्य पेंदाम, सारंग गेडाम,चैतन्य कोवे, कुंदन कोवे, प्रजण्य सलामे,जितू आत्राम, जिवन मेश्राम, आदि युवकांनी पुढाकार घेत पक्षात प्रवेश केला.