रामनगर पोलिसांची धाडसी कारवाई.
दोन आरोपी सह मुलीला आणले परत.
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील एक मुलगी गोंदिया येथे केटरिंगच्या कामाला गेली असता एका अज्ञात महिलेने त्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिची राजस्थान येथे विक्री करण्यात आली. बेपत्ता मुलीची रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तिच्या नातलगांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या मोबाईल ट्रेस केला असता तिच्या मोबाईल चे लोकेशन राजस्थान येथील जिल्हा झालावड येथे लोकेशन आढळून आले. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या नेतृत्वात कोणतीही वेळ न दवडता रामनगर पोलिसांनी पिएसआय पंचबुद्धे यांच्या नेतृत्वात चार जणांची टीम बनवून व सोबत चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सुनिता अग्रवाल यांना राजस्थान येथे दिनांक 14 नोव्हेंबर ला रवाना करण्यात आले. रामनगर पोलिसांनी राजस्थान येथील झालावाड़ जिल्ह्यातील सदला या गावी सिनेस्टाईल सापळा रचत बेपत्ता मुलीचा शोध घेतला व त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतले. त्या बेपत्ता मुलीची विक्री करणाऱ्या राजस्थानी येथील दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक करून चंद्रपूर येथे आणले आरोपीचे नाव पवन भेदा व तुफान सिंग भिल असे असून त्यांच्यावर 363, 366, 368, 370, 504, 576, 34, गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास psi पंचबुद्धे , भास्कर वाघ, सुजित मोरे, अमित मस्के यांनी केला.
बेपत्ता झालेल्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल व मारुती काटकर यांनी मोलाची भूमिका बजावली. चंद्रपूर पोलिसांनी कर्तबगारी दाखवित सदर प्रकरणाचा उलगडा केला.