जिल्ह्यात तीन दिवसात तीन खूण.
Bhairav Diwase. Nov 20, 2020
वरोरा:- तालुक्यातील बोर्डा गावचा रहिवासी असलेल्या शेखर नथू सरोदे (वय 32 वर्षे) याची शेती सागरा वाघेडा या गावी आहे. शेखर नथू सरोदे यांनी शेतात सोयाबीन चे पीक घेतल्यानंतर शेतामध्ये हरभरा पेरला शेत मालाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी काटेरी कुंपणाचे काम करीत असताना चुलत भाऊ प्रफुल गुलाब सरोदे याचाशी शेतीच्या जागेसाठी वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की वादाचे रूपांतर हनामारीत झाले आरोपी प्रफुल सरोदे व विशाल आगलावे यांनी शेखर सरोदेला लाठ्या-काठ्या नी मारहाण केली त्यात शेखरच्या जागीच मृत्यू झाला मृत्यू देह शेतातील विहिरीच्या जवळ फेकून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेतील आरोपी प्रफुल गुलाब सरोदे ( रा सागरा ) विशाल आगलावे (वरोरा भांजी वार्ड) असून दोन्ही आरोपींना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.