पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाला यश.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत सुविधाजनक असलेली नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरु व्हावी अशी आग्रही मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्रा च्या माध्यमातून केली होती. या आग्रही मागणीची दखल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी येत्या २२ नोव्हे. पासून नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरु करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.
नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरु झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नांसाठी आभार व्यक्त केले आहे.
सदर नवजीवन एक्सप्रेस हि चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक उपयोगी असून हि एक्सप्रेस सुरु व्हावी या अनुषंगाने हंसराज अहीर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते या निवेदनाची त्वरित दखल घेऊन त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे आग्रही विनंती केली होती अशी माहिती चंद्रपूर रेल्वे संघर्ष समिती. हंसराज अहीर यांच्या फलदायी प्रयत्नांकरिता चंद्रपूर रेल्वे संघर्ष समिती तर्फे सर्वश्री दामोदर मंत्री, रमणीकभाई चव्हाण, श्रीनिवास सुंचूवार, डॉ. भूपेश भलमे, देवेंद्र हिंगोरानी, अरुण तिखे, प्रल्हाद शर्मा, दीपक सोमाणी, प्रदीप माहेश्वरी, पूनम तिवारी, नरेश लेखवानी, महावीर भट्टड, डॉ. सुशील मुंधडा, सुरेंद्र गांधी, अनिश दीक्षित, दिनेश बजाज, आर. के. देवडा, महावीर मंत्री, संजय जवादे, नरेंद्र सोनी, सुनील भट्टड, पी. सी. राजू, शाजी जॉन, अमृतलाल पाल, प्रभाकर मंत्री यांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे अभिनंदन तथा आभार व्यक्त करण्यात आले आहे.