बिबी येथे फटाकेमुक्त दिव्यग्राम २०२० महोत्सव.
डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे पुरस्कार प्रदान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे सामाजिक संवेदना जीवंत आहेत. समाजाला प्रेरणा देणा-या व्यक्तीमत्वाचे कार्य दिशादर्शक असते. माझ्या बिबी जन्मगावातील लाखो अस्थिरुग्नावर निःशुल्क उपचार करुन बरे करणारे समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांचे कार्य समाजासाठी भुषण आहे. समाज उन्नतीसाठी कर्तृत्वाचे दिप असेच तेवत राहावे, यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून सेवाकार्यात सर्वतोपरी सहकार्यासाठी मी ग्रामस्थासोबत आहे, असे मत माजी आमदार व शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांनी मांडले. समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबी तर्फे आयोजित 'दिव्यग्राम' महोत्सवात ते बोलत होते. यावेळी समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, पं.स.सदस्य सविता काळे, स्वागताध्यक्ष संतोष उपरे, साईनाथ बुचे, शंकर आस्वले, राहूल आसूटकर, संतोष पावडे, बापूजी पिंपळकर, प्रा.अनिल डहाके आदी उपस्थित होते.
मागील ९ वर्षांपासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त, ग्रामस्वच्छतेने व प्रबोधनात्मक उपक्रमाने साजरी करण्यात येते. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी देण्यात येणारा मानाचा जीवन गौरव पुरस्कार नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते व वनराई विश्वस्त, माजी आमदार गिरीश गांधी तर सेवार्थ सन्मान आदिवासीबहूल जिवती तालुक्यातील ३६५ दिवस चालणा-या पालडोह जि.प.शाळेचे प्रेरणादायी आदर्श शिक्षक राजेंद्र परतेकी यांना प्रदान करण्यात आला. सेवार्थ सन्मान स्वीकारताना राजेंद्र परतेकी म्हणाले की, डॉ. गिरिधर काळे यांच्या कार्याच्या प्रेरणेतून बिबी येथील युवक करीत असलेले काम प्रशंसनिय आहे. माझ्या कार्याचा झालेला गौरव अविस्मरणीय असेल. स्वागताध्यक्ष संतोष उपरे म्हणाले, अहंकारापासून दूर राहत लोकसहभागातून जे कार्य होते त्यात यश निश्चित मिळते. आगामी काळात विविध सामाजिक पुढाकारातून आम्ही युवक कार्य करीत राहू अशी भुमीका मांडली.
कार्यक्रमात कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक विषयांवर रांगोळी व मेहंदी स्पर्धा तसेच कोरोना नियमांचे पालन करत जनजागृती दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी गावकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीने गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. संचालन शुभम डाखरे तर आभार हबीब हबीब शेख यांनी माणले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपचे रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, अॅड.दीपक चटप, गणपत तुम्हाणे, संदीप पिंगे, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके, सुनिल भोयर, विशाल अहिरकर, विठ्ठल अहिरकर, सुरज लेडांगे, समीर शेख, प्रमोद विरुटकर, कमलाकर उरकुडे, राकेश बोबडे, इराणा तुम्हाणे, आकाश उरकुडे, महेश नाकाडे, चंपत तुम्हाणे, महेश राठोड, अजित काळे, गोपाल मडावी, संतोष बावणे, आकाश चटपल्लीवार, गणपत मडकाम, निलेश उरकुडे, सुरज मडावी, विशाल उपरे, अनिकेत मडावी, वैभव आमने, निलेश उरकुडे व मित्रमंडळींनी सहकार्य केले.
बिबी येथे शाळकरी मुलांनी एकत्र येत सेवार्थ गृप तयार केला. २०११ पासून दिवाळी ही ग्रामस्वच्छता व पर्यावरणपूरक फटाकेमुक्त साजरी करण्याचे ठरवले. मागील ९ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून हा गावाचा दिव्यग्राम महोत्सव झाला. बिबी गावाची शान व ओळख सातासमुद्रापार नेणारे प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या सेवेच्या सन्मानार्थ सेवार्थ गृप, सेव्हन स्टार स्पोर्टींग क्लब, शिवराजे मंडळ व गावातील युवकांनी एकत्र येत या उपक्रमातून विधायक कामांना सुरुवात केली. ९ वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम इतर गावांना प्रेरणादायी ठरत आहे.