Top News

पदवीधर मतदार संघाचे भाजपा व मित्र पक्ष्याचे चे अधिकृत उमेदवार संदीप जोशी ची गडचांदूर मध्ये संवाद सभा संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील, भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी,( आठवले गट),बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरीप यांचे अधिकृत उमेदवार मा संदीप भाऊ जोशी यांच्या प्रचारा निमित्य गडचांदूर येथे संवाद सभा घेण्यात आली.सदर सभेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री मा हंसराज भैय्या अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मा संदीपजी जोशी,चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष मा देवराव भाऊ भोंगळे,माजी आमदार सुदर्शनजी निमकर,माजी जिल्हाधक्ष मा हरिषजी शर्मा,पोंभुरणा पंचायत समिती च्या सभापती तथा भाजपा महिला  जिल्हाध्यक्षा मा अल्का ताई आत्राम,चंद्रपूर जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे,चंद्रपूर जिल्हा महामंत्री मा नामदेव डाहूले,चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष मा आशिष  देवतळे,राजू घरोटे,नारायनजी हिवरकर उपस्थित होते.
सदरच्या संवाद सभेत मा देवरावजी भोंगळे व त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांनी आपले मनोगत व्यक्त केले की,आपल्या पक्ष्यानी आपल्या नागपूर पदवीधर मतदार संघात मा संदिपजी जोशी सारख्या कणखर नेतृत्व असलेले व त्यांनी पक्षयात युवा संघटने पासून मोठं मोठे पदे भूषविले व ती योग्य पार पडली.ते आता महापौर असून त्यांचा नागपूर शहराच्या विकासात खूप मोठा वाटा आहे व अश्या नेतृत्वाची आज गरज आहे मागील 1958 पासून हा मतदार संघ भाजपा कडे राहिला तो आपल्या सारख्या कार्यकर्त्या मुळेच व आज सुद्धा आम्हाला विश्वास आहे की या वेळेस सुध्दा आपण प्रामाणिक पणे आपली जबाबदारी पार पाडाल असा विश्वास असल्याचे बोलले
         तर पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीपजी जोशी नि सुद्धा आपल्या कार्यकर्त्या मुळेच हा मतदार संघ मागील 50 वर्ष्या पासून भाजपा च्या ताब्यात आहे व आज सुद्धा ह्या मतदार संघ कायम ठेवाल असा मला विश्वास आहे.मी निश्चित पणे निवडून आल्या नंतर विध्यार्थी,शैक्षणिक,शिक्षकांचे व सर्व पदवीधर मतदारांचे काम मार्गी लावण्याचे वचन देते मला युवा मोर्च्या ते वार्ड प्रमुखा पासून तर आज नागपूर सारख्या शहराच्या महापौर पदाची जबाबदारी पक्ष्यानी दिली असून मी माझ्या कर्तव्यास तडा बसू दिला नाही व पुढेही मी बसू देणार नाही याची ग्वाही दिली.उपस्थित कार्यकर्त्यांना व मतदारांना विनंती केली की आपण मला पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे.यावेळी प्रमुख पाहुण्यासह गडचांदूर चे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे ,रामसेवक मोरे,जेष्ठ नेते महेश शर्मा ,शिवाजी  सेलोकर,हरीश घोरे,संदिप शेरकी पुरुषोत्तम भोंगळे, जगदीश पिंपळकर प्रमोद पायघन युवा मोर्चा ता. अध्यक्ष रोहन काकडे राकेश अरोरा सत्यदेव शर्मा दिनेश खडसे कार्तिक गोंलावर ,युवा मोर्च्यांचे आशिष ताजने व त्यांचे सहकारी उपस्थित होते सभेचे संचालन सतीश उपलेंचवार नि तर आभार प्रदर्शन निलेश ताजने यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने