Top News

पुतळा परिसर स्वच्छ करून क्रांतिसूर्य ज्योतीबांना आदरांजली.

महानगर भाजप व भाजयुमोचा अनोखा उपक्रम.
Bhairav Diwase. Nov 29, 2020
चंद्रपूर:- महापुरुषांची जयंती असो की पुण्यतिथी, त्यांना आदरांजली वाहून त्यांचे कार्य स्मरण करण्याचा हा दिवस. असाच एक दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी.भारतीय जनता पार्टी व भाजयुमो महानगर,चंद्रपूरच्या कार्यकर्त्यांनी ,पुतळापरिसर स्वच्छ करीत महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून यंदाची पुण्यतिथी अविस्मरणीय केली. हा विषय आता महानगरात चर्चेचा ठरला आहे.

               एप्रिल २०१५ मध्ये महाकाली प्रभागातील भिवापूर वार्ड येथील ठाकरे वाडीत समाजसेविका गिताताई कीनेकर यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.नदीच्या काठावर असणाऱ्या या पुतळ्याकडे कुणाचेच नंतर लक्ष गेले नाही.परिसरात बराच कचरा जमा होऊन तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले.परिणामी पुतळा पण धुळीने माखला.ही बाब भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आज शनिवार(२८ नोव्हेंबर) महात्मा ज्योतिबा फुलें पुण्यतिथीला स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला आणि भाजपा- भारतीय जनता युवा मोर्चाची चमू कामाला लागली.तब्बल ३तास हे अभियान चालले.भाजप जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात भाजपा नेते रवी गुरनुले,अरुण तिखे,रामकुमार अकापेलीवार, युवानेते प्रज्वलंत कडू, राकेश बोमनवार ,योगेश कुचनवार ,शैलेश इंगोले ,यश बांगडे, कुणाल गुंडावार, श्रीकांत येलपुलवार, मनोज पोतराज, सचिन यामावार, पवन निखाते, विवेक शेंडे, रामनारायण रविदास, अभी पांढरे, संजय पटले, प्रशस्त्र डंभारे, राजेश यादव, प्रवीण उरकुडे ,हिरालाल निषाद, संतोष जिल्लावार, मोहन मंचलवार, गुंजत्र चहारे ,शुभम सुलभेवार आदी कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छता अभियानात सहभाग घेत महात्मा ज्योतिबा फुले यांना माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी बोलताना डॉक्टर मंगेश गुलवाडे म्हणाले,क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यात झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव होते. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते.

             शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. फुलेंची बुद्धी अतिशय तल्लख होती, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. महात्मा फुले नावाने हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
             
          ज्योतिबांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहेत. ज्योतिबा नसते क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या पुढाकारातून मातृ शक्तीचा विकास झाला हे मात्र तितकेच खरे. महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतीय जनता पार्टी महानगर व भाजयुमो महानगर चंद्रपूर च्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहो.ज्योतिबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू यांनी केले तर यश बांगडे यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने