चंद्रपूर व घुग्घूस या दोन शहराचा औद्योगिक शहरे प्रदुषित क्षेत्राच्या यादीत.
Bhairav Diwase. Nov 06, 2020
चंद्रपूर:- चंद्रपुरात असलेल्या कोळसा खाणी, आणि वीज केंद्राच्या प्रदुषणामुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. कोरोना काळात उद्योग बंद असल्याने चंद्रपूरसह महाराष्ट्राच्या प्रदूषणात 30 ते 55 टक्क्याने घट झाली होती.
जानेवारी ते मार्च 2020 प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात चंद्रपूर व घुग्घूस या दोन शहराचा औद्योगिक शहरे प्रदुषित क्षेत्राच्या यादीत झळकली आहे. तर सर्व प्रकारच्या वायू प्रदुषणात मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सन 2019-20 या वर्षाचा अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रासह देशातील उद्योग बंद ठेवण्यात आली. रेल्वे, वाहतूक बंदी केली गेली. त्यामुळे उद्योगाची चाके थांबली. गाड्याची चाके थांबली होती. या कारणाने वातावरण ढवळून निघाले. आणि प्रदूषणात कमालीची घट दिसून आली. दरम्यानच्या काळात वायू, जल प्रदूषणात घट झाली होती.
चंद्रपूर जिल्ह्याच्या चारही बाजूंनी असलेल्या कोळसा खाणी, वीज केंद्र, सिमेंट प्रकल्प, कच्चा लोहनिर्मितीचे कारखान्यातून उत्पादन सुरू झाले आहे.
चंद्रपूर व घुग्घूस येथे उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतुक, वाहने, कचरा, कचरा ज्वलन, बांधकाम, रस्त्याची धुळ आणि घरगुती प्रदुषण हे वायू प्रदूषणाचे स्त्रोत ठरली आहे. घुग्घुस येथे सभोवताल कोळशाच्या खाणी, सिमेंट उद्योग आणि आयर्न ओरचे कारखाने आहेत. धुळीकरणांच्या प्रदूषणात घुग्घूस व चंद्रपूर धोकादायक स्थितीत आहे.