अर्थ फाउंडेशन चा कुपोषण विरुद्ध एल्गार.

Bhairav Diwase
अर्थ फाउंडेशन तर्फे जीवति तालुक्यात मिशन संजीवनी पोषण अभियानचे उदघाटन.
 
27 कुपोषीत बालकांना पोषण आहार  किट व आरोग्य कार्ड चे वाटप, गडचान्दुर येथील हार्डवेअर-प्लायवूड असोसिएशन चे विशेष सहकार्य.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल समजला जाणारा जिवती तालुका कुपोषण मुक्त व्हावा तसेच कोवळी पानगळ थांबावी यासाठी जिल्ह्यातील समाजसेवक आरोग्य दूत डॉ कुलभूषण मोरे यांच्या अर्थ ग्रामीण आरोग्य व संशोधन संस्थान च्या  पुढाकाराने लोकसहभागातुन मिशन संजीवनी पोषण अभियान  हा उपक्रम पहिल्या टप्प्यात जिवती तालुक्यात राबविण्यात येत आहे. याचे उदघाटन  प्रसंगी उद्घाटक म्हणून मा हरिभाऊ मोरे (मा सभापति न प गडचान्दुर ) , अध्यक्ष मा.हेमंत भाऊ वैरागडे (अध्यक्ष व्यापारी असो. गडचान्दुर ) , प्रमुख पाहुने मा.डॉ भूषण मोरे (संचालक अर्थ) , मा प्रशांत गोखरे(गोखरे हार्डवेअर) ,मा सुनील बोंडे ,  मा बारापात्रे मैडम (एकात्मिक बालविकास विभाग पर्यवेक्षिका) , राजेश राठोड , जीवन तोगरे तसेच अंगनवाडी सेविका , मदतनिस , बालक व सोबत पालक वर्ग उपस्थित होते .या   उपक्रमात अंतर्गत जीवति व केकेझरी या दोन केंद्रातील 27  कुपोषित बालकाना आहार पोषण किट देण्यात आल्या . तसेच अनगंवाडी सेविका ना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. उर्वरित बालकाना दुसर्या टप्प्यात आहार पोषण किट देण्यात येणार आहेत असे अर्थ चे संचालक डॉ मोरे यानी  सांगितले 
      या अभियाना साठी अर्थ फाउंडेशन चे संचालक डॉ कुलभूषण मोरे , सल्लागार सदस्य प्रा किरणकुमार मनुरे , सल्लागार मार्गदर्शक प्रा. डॉ राजकुमार मुसने , कोर्डिनेटर गणेश ढगे, आरोग्यदुत सनी गाजर्लावार , आरोग्य दूत साहिल धोटे ,आरोग्य सखी हर्षा भोयर  तसेच तालुका बालविकास अधिकारी मा गारुळे सर आणि अंगनवाडी सेविका  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.