Top News

बांबू कारागिरांना हिरवा बांबूचा पुरवठा करा.

वनविभागाला निवेदन सादर.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर झोन शेत्रात पाच ते सात हजार बांबू कारागीर असून बहुतेक आदिवासी भागात बांबू कारागीर आहेत आदिवासी हे बांबूपासून वेगवेगळे साहित्य बनवत असतात चार पिढ्या पासून आदिवासी हे बांबू पासून तयार केलेल्या वस्तू विक्री तून आपला उदरनिर्वाह करतात.
बफर झोनशेत्रातील पळसगाव वनपरिक्षेत्र व शिवनी वनपरिक्षेत्रात हिरव्या बांबूपासून बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत परंतु मागील दोन वर्षापासून बांबू कारागिरांना हिरव्या बांबूचा पुरवठा होत नाही हिरव्या बांबूचा पुरवठा व्हावा याकरिता जी गुरुप्रसाद उपसंचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच एस भागवत विभागीय वन अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले


बफर झोन शेत्रातील पळसगाव व शिवणी वनपरिक्षेत्रात पाच ते सात हजार बांबू कारागीर है हिरव्या बांबूवर आधारित वस्तू बनवण्याचे काम करीत असतात पळसगाव पिपर्दा शिवनी शिरकाढा वासेरा सिंगर धरी पेपर हेटी पांढरवाणी येथील बांबू कारागीर यांचा पोट भरण्याचा मुख्य व्यवसाय हा बांबूवर आधारित वस्तू बनवणे आहे मागील दोन वर्षापासून वनविभागाच्या वतीने बांबूचा पुरवठा होत नसल्याने कारागिरांवर उपासमारीची पाळी आली आहे
 वन हिस्त्र प्राण्यामुळे गावा गावात भितीचे वातावरण पसरले आहे शेती करणे सुद्धा शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे बफर झोन क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती ही धोक्यात आली आहेत्यातच बांबू करागिरावर सुद्धा उपासमारीची पाळी आली आहे बांबू कारागिरांना वन डेपोमध्ये बांबूचा पुरवठा करावा याकरिता सुनील घाटे सामाजिक कार्यकर्ता तथा शिंदे वाई तालुका आम आदमी पार्टी उपाध्यक्ष श्री प्रभाकर जी गजभिये अध्यक्ष इको डेव्हलपमेंट समिती पळसगाव उत्तम ढोक सामाजिक कार्यकर्ता हरिदास भिमटे तुलाराम आत्राम सचिन गुरनुले कवडू कुंबरे विकी पेंदाम व इतर बांबू कारागीर यांनी नुकतेच निवेदन सादर केले
 श्री जी गुरुप्रसाद यांनी निवेदन देताना कारागीर सोबत दोन ते तीन महिन्यात हिरवा बांबू तोडून सदर बांबू डेपो टाकण्याचे आश्वासन दिले तसेच बफर झोन क्षेत्रात रोजगार निर्मितीवर भर देऊन जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने