भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी (ग्रा) अविनाश पाल यांची निवड.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले श्री.अविनाशभाऊ पाल यांची भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्षपदी (ग्रा) निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रात अभिनंदनाचा वर्षाव.
      सावली तालुक्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, धर्मजागरण, शैक्षणिक,सामाजिक ,आरोग्य इत्यादी सेवेमधुन प्रथम कार्याला सुरुवात केले.      
                    त्यानंतर भाजपा कडुन पंचायत समिती सदस्य म्हणून दोन वेळा पद भूषविले. तालुक्यामध्ये ही संघटनेचे कार्य सुरळीतपणे पार पाडले. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून सुद्धा काम केले. त्यांचे संघटनात्मक कार्य पाहून भारतीय जनता पार्टीने तालुकाध्यक्ष हे पद दिले.
                             तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्यात सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन अनेक मोर्चे,धरने, आंदोलन, निवेदन देऊन तसेच तालुक्याच्या विकासासाठी शासनाकडून विविध कामे मंजूर करुन घेतली. संघटनात्मक कार्य करून भाजपा संघटना मजबूत केली. 
       त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली. तालुक्यात मुख्य प्रशासक पदी असतांना शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिले. शेतकरी मेळावा, शेतकरी ताराण योजना अशा अनेक शेतकऱ्यांच्या उपयोगी योजना त्यांनी केले.
                                 अविनाशभाऊ नी तालुक्यामध्ये केलेल्या कार्याची पावती म्हणून जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली. भारतीय जनता पार्टीने ओबीसी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.
                        ओबीसी जिल्हाध्यक्ष निवडीचे श्रेय अविनाश भाऊ पाल यांनी मान.आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार मा.मंञी, मान.हंसराजभैया अहिर माजी केंद्रीय राज्यमंत्री, खास. अशोकजी नेते, आम. बंटीभाऊ भांगडिया, श्रीमती शोभाताई फडणवीस मा.मंञी मा.आम.प्रा.अतुल भाऊ देशकर,जि.प.अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरीष भैय्या यांना देण्यात आले
                                     तसेच अविनाश भाऊ पाल यांनी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते याचे आभार मानले