"त्या" मुलांच्या वाट्याला अचानक आले पोरकेपण!

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलारा या आदिवासी गावात मालुताई व प्रमोद रामचंद्र जीवतोडे यांचा सुरळीत संसार सुरू होता. नैतिक व कार्तिक नामक दोन अपत्ये झाली. अचानक मागील वर्षी पोळ्याला मालूचा मृत्यू झाल्याने सुधाकरवर आभाळ कोसळले. कसाबसा दोन मुलांचा सांभाळ करीत असतानाच ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरला सुधाकरचा शेतात सोलर वीज प्रवाहाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे साडेतीन वर्षांचा नैतिक व १८ महिन्यांचा कार्तिक आई वडिलाच्या मायेपासून पोरके झाले आहेत.

हेही वाचा:- सौरऊर्जेच्या करंटने विवाहित युवकाचा मृत्यू.


चिमूर तालुक्यातील बेलारा या गावातील प्रमोद रामचंद्र जीवतोडे यांची पत्नी मालू हिचा पंधरा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला तर प्रमोद जीवतोडे याचा दिवाळीच्या दिवशी सोलर मशीनच्या तारात पाय गुंडाळल्याने मृत्यू झाला.
ज्या वयात बालकाला मातृत्वाची व पितृत्वाची आवश्यकता होती. त्याच वयात या दोन निरागस भावंडावर पहिले गुरू म्हणून जीवनाचे बाळकडू शिकवण्याची वेळ होती,
त्याच वयात या दोन्ही भावंडांना आई वडिलांच्या मायपासून पोरके होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांच्या अकाली जाण्याने नैतिक व कार्तिकची जबाबदारी म्हाताऱ्या मंजुळाबाई व रामचंद्र जीवतोडे या आजी-आजोबावर आली आहे.