काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्या कडून अशी शिवी गाळ शोभते का?
नगर पंचायत चा भोंगळ कारभार व गैरव्यवहारची पोल खोल न्यूज पोर्टल मधून होत असतांना न्यूज पोर्टलचे पत्रकार, संपादक मोहबत खान व त्यांच्या परिवारावर हल्ला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- नगर पंचायत चा भोंगळ कारभार व गैरव्यवहरा बाबत न्यूज पोर्टलच्या संपादकांनी वृत्त टाकत जनते पर्यन्त माहिती पोहचविण्याचे काम केले पण या गैरव्यवहार व भ्रष्टकामाची पोलखोल होताना पाहून विजय बावणे यांनी फोनवर खालच्या भाषेत पत्रकाराला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली यातच काही वेळाने विजय बावणे यांचा मुलगा व त्याच्या समर्थकांनी पत्रकार मोहबत खान यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण व धकाबुकी केली घरच्या महिलांनी आई व बहिणीने मध्यस्ती केली असता त्यांना सुद्धा धक्का बुक्की व मारहाण झाली त्यात महिला किरकोळ जखमी झालेल्या ची माहिती मिळाली पोलीसांकडून त्यांचं मेडिकल टेस्ट करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
हेही वाचा:- विजय बावणे सह समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला.
कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्या कडून खालच्या भाषेत शिवीगाळ करणे किती लज्जास्पद आहे फोन वर बोलताना विजय बावणे यांनी मोहबत खान याना फोनवर शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली हि ऑडिओ क्लिप सम्पूर्ण जिल्ह्यात वायरल होत आहे असे अशोभनीय वर्तणूक कांग्रेस च्या वरिष्ठ नेत्याला शोभण्यासारखे आहे का? एवढी हिंमत वाढली कशी पोलीस निरीक्षक यांच्या समोरच पोलीस ठाण्यात मारण्याची धमकी दादागिरी व शिवीगाळ या नेते लोकांची एवढी हिंमत वाढलीच कशी असा सवाल आता जनता करायला लागली पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेलेल्या पत्रकार मोहबत खान याना पोलीस ठाण्यात च मारण्याचा प्रयत्न झाला व शिवीगाळ करण्यात आली असा एक व्हिडिओ समोर आला.
आमच्या प्रतिनिधी नि कोरपना पोलीस ठाण्या चे ठाणेदार गुरनुले साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क केला असता पोलीस ठाण्यात दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. पोलीस ठाण्यात धक्काबुक्की वा मारझोड झाली नाही असे सांगितले तरी पण या लोकांची एवढी हिंमत कि पोलीस निरीक्षकांसमोर खालच्या भाषेत शिवीगाळ करणे म्हणजे हे कायद्याला घाबरतच नाही हे स्पष्ट होते आता पोलिसांसमोर आव्हान कि अश्या बड्या नेत्यावर अटक होणार की यातून मुक्त होणार या कडे सर्व कोरपना तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे