दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई होणार, लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता सरपंच विजय रणदिवे यांच्या लढ्याला यश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील धानोली येथील घरकुल लाभार्थी आनंदाबाई मडावी हिला २०१५-१६ यावर्षी इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असता कोरपणा पंचायात समिती यांच्या हलगर्जीमुळे आनंदाबाई मडावी यांना चार वर्ष घरापासून वंचित राहावे लागले यासाठी धानोली ते सरपंच विजय रणदिवे यांनी अनेक वेळा निवेदन दिले तरीसुद्धा न्याय मिळाला नाही अखेर कोरपणा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिबा मिळत असल्याने प्रशासन हादरले होते, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन जिल्हा परिषद चे मुख्यकार्यपलन अधिकारी यांच्याशी दुरधनी द्वारें चर्चा करून घरकुल लाभार्थी आनंदबाई मडावी या महिलेवर पंचायत समिती प्रशासनाने कशा प्रकारे अन्याय करून घरकुलपासून वंचित ठेवले हे मुखकार्यपालन अधिकारी यांना पटवून दिल्यानंतर काही वेळातच पंचायत समिती च्या वतीने सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडविण्यात आले, यावेळी , तहसीलदार वाकलेकर, नारायण हिवरकर, जिल्हा परिषद सभाती सुनील उरकुडे सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर अमोल भाऊ आसेकर कोरपना नगरसेवक किशोर बावणे, पुरुषात्तम भोंगळे, शशीकांत आडकीने, अरुण मडावी सरपंच धानोली, ओम पवार, येथील महिला व ग्रामस्थ सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित आनंदाबाई मडावी व सरपंच विजय रणदिवे यांचे उपोषण सोडण्यात आले.