Click Here...👇👇👇

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या; तालुक्यात आत्महत्याचे सत्र सुरूच.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 07, 2020
यवतमाळ:- मारेगाव तालुक्यातील केगाव (मार्डी) येथील रहिवासी शेतकरी पुत्राने विष घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही घटना शुक्रवार च्या रात्री 7:30 च्या दरम्यान घडली असून अखिल नथ्थु कनाके (35 )असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
           
            प्राप्त माहिती नुसार शुक्रवार ला घरी कोणी नसतांना त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. आत्महतेचे कारण कळू शकले नाही. त्याच्या मागे पत्नी दोन लहान मुले आई वडील, तीन विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र टोंगे (जामदार )तपास करीत आहे.