पाच एकरात निघाला फक्त दोन किंटल कापूस; शेतकरी हवालदिल.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- जगात कोरोना विषाणु ने थैमान घातला आहे. दुसरीकडे हवालदील झाल्याच चित्र दिसत आहे. कोरपना तालुक्यातील येत असलेल्या गडचांदुर शिवरतील शेतकरी सुभाष एकरे यानी आपल्या शेतात पाच एकर मधे कपाशीची लागवड केली. पण कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात दिसुन येत होता. परतीचा पाऊस अतिवृष्टी अशा संकटातुंन पिकाचे रक्षण केले. आता मात्र शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळी संकट आले. पाच एकर मधे दोन क्विटल कापूस झाला व उत्पन्न काहीच न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत येऊन शेतातील पाच एकर कपाशीवर टॅक्टर चालवला. अशी वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. गुलाबी बोंडअळीवर उपाय योजना नाही केली. तर जगावे कसे अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येणार आहे.
कपाशीवर बोंड अळी आल्याने उत्पन्न काही झाल नाही. त्या मुळे मि चिंतेत येऊन पाच एकर शेतातील कपाशीवर टॅक्टर चालवुन संपुर्ण पिक कपाशी तुड़वली.
सुभाष एकरे
शेतकरी गडचांदुर