राजुरा तालुक्यातुन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी सतीश धोटे, विनायक देशमुख, मधुकर नरड यांची निवड.

Bhairav Diwase
जिल्हा सचिव पदी राजुरा तालुक्यातून वाघुजी गेडाम व  हरिदास झाडे यांची निवड.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी त्‍यांची कार्यकारीणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीच्या भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी राजुरा तालुक्यातील सतीश धोटे, विनायक देशमुख, आणि मधुकर नरड यांच्या देखील समावेश करून नियुक्ती करण्यात आली. तर भाजपा जिल्हा सचिव म्हणून राजुरा तालुक्यातील वाघुजी गेडाम आणि हरिदास झाडे यांचा देखील समावेश करून निवड करण्यात आली.
         नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार मा. अॅड. संजयभाऊ धोटे, माजी आमदार मा. सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती मा. सुनीलभाऊ उरकुडे आदिंनी अभिनंदन केले.