श्री.संताजी जगनाडे महाराज यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे:- डॉ.मंगेश गुलवाडे

Bhairav Diwase. Dec 08, 2020
चंद्रपूर:- चंद्रपुर महानगरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर च्या वतीने श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ.मंगेश गुलवाडे बोलत होते त्यांनी पुढे बोलतांना सांगितले की तेली समाजाचे आराध्यदैवत यांची जयंती शासकीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे व योग्य दिशा दाखवणारे आहे त्यांच्या विचारांवर मार्गक्रमन केल्यास जीवन सुधारेल असेही यावेळी बोलतांना सांगितले.
          याप्रसंगी चंद्रपुर महानगरातील भाजपा पदाधिकारी यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश जी गुलवाडे, श्री.राजेंद्रजी गांधी, श्री.प्रमोदजी कडू, श्री.विशाल जी निबाळकर, श्री.प्रकाश जी धारणे, श्री.राहुल जी पावडे, श्री.वसंता जी देशमुख,श्री.दत्तप्रसन्न जी महादानी, सौ.अंजलीताई घोटेकर, श्री.रवींद्रजी गुरनुले, श्री.ब्रिजभूषणजी पाझारे, श्री.रामपाल जी सिंग, सौ.कल्पनाताई बगुलकर, श्री.प्रदीपजी किरमे, श्री.धम्मप्रकाश भस्मे,श्री.धनराज जी कोवे, श्री.रवी जी लोणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने