चंद्रपूर:- 8 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान प्रवासी ऑटो क्र. एम एच 34 डी 7187 मध्ये मागच्या डिक्कीत तिन चुंगळ्यात सहा पेटी अवैध देशी दारु वणी तालुक्यातुन घुग्घुस मार्गाने चंद्रपुर कडे जात असल्याची गुप्त माहिती घुग्घुस पोलीसांना मिळताच घुग्घुस येथील राजीव रतन चौकात सापळा रचून आरोपी विजय भीमराव गोवर्धन (45) रा. तुकूम चंद्रपुर यास अटक केली. दारु किंमत 30 हजार व ऑटो किंमत 1 लाख असा एकुण 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाही पो नि राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहा.फौजदार गौरीशंकर आमटे सचिन बोरकर मनोज धकाते प्रकाश करमे सचिन डोहे रंजित भुरसे नितीन मराठे यांनी केली.