नागभीड:- येथील चिटणीस पुरा वार्डातील अविवाहित युवक गौरव शालीक गुरुनुले वय 24 वर्ष यांनी स्वतःच्या राहत्या घरात घराच्या आडयाला दोरी बांधून गळफास घेतला. मात्र तीन दिवसापासून आतील दार बंद असल्यामुळे कुणाच्या ही लक्षात आले नाही. परंतु कुजलेल्या स्थितीत असलेल्या प्रेताची वास येत असल्याने तळोधी बा.पोलिस स्टेशन ला माहिती देऊन पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला.
युवकांनी गळपास लागून आत्महत्या का केली? अजून पर्यत कारण कळू शकले नसून, तळोधी बा. पोलिस स्टेशन चे ठानेदार रंविन्द खैरकर यांच्या मार्गदर्शना खाली तळोधी बा.पोलीस स्टेशन चे एस.आय.मुळेवार पुढील तपास करीत आहे.