सोसायटीची वटवृक्षा कडे वाटचाल:- अध्यक्ष सौ. किरणताई बोढे
चंद्रपूर:- घुग्गुस येथील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा पहिला वर्षपूर्ती सोहळा थाटात संपन्न झाला.
सोयायटीच्या कार्यालयात लक्ष्मी मातेच्या प्रतिमेस द्विप प्राज्वलीत करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात मार्गदर्शिका सौ. अर्चनाताई भोंगळे यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा सौ. किरणताई बोढे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीलाएक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात 3000 तीन हजार महिला सभासद झाल्या आहे. या एका वर्षात सोयायटीने करोडो रुपयाची उलाढाल केली आहे. सोसायटीवर तीन हजार महिलानी विश्वास दाखविला त्याबद्दल सोसायटीच्या अध्यक्ष या नात्याने त्यांचे खूप खूप आभार मानते असे त्या म्हणाल्या.
यावेळी मार्गदर्शिका सौ. अर्चनाताई भोंगळे, अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, उपाध्यक्ष निशा उरकुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम संचालक मंडळाच्या सारिका भोंगळे, सीमा पारखी, संचालिका सुनंदा लिहीतकर, लिपिक प्रीती धोटे उपस्थित होत्या. मागील वर्षी 24/12/2019 ला घुग्गुस येथील सोनारकर कॉमप्लेस येथे प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यालयाची स्थापन करण्यात आली होती..
मागील एका वर्षात 178 महिला बचत गटाना पंचायत समितीशी जोडण्यात आले. आणि या बचत गटाना पंचायत समिती मार्फत करोडो रुपयाचे कर्ज पुरवठा करण्यात आला. सोसायटीच्या वतीने 5,000 कॅलेण्डर मोफत वाटप करण्यात आले. हळदी कुंकू निमित्य पर्स वाटप करण्यात आले. सभासद महिलांना छत्री आणि बचतगटांना दरींचे वाटप करण्यात आले. आता या सोसायाटिची वटवृक्षा कडे वाटचाल होत आहे.