(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वानील जाधव यांची बदली गडचिरोली जिल्हयात झाल्याने येथील पद रिक्त आहे परंतु महाराष्ट्र शासनाने पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यासाठी २०१७-२०१८ आणि सन २०१९ -२०२० ची निवडसूची नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
शासनाच्या जाहीर झालेल्या पदोन्नती नुसार राजुरा येथील रिक्त जागेवर श्री राजा शेरसिंग पवार याची नियुक्ती झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती प्राप्त करणारे राजा पवार यापुर्वी महामार्ग पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच्या राजुरा येशील नियुक्तीमुळे राजुरा पोलीस विभागाला पुर्ण वेळ उपविभागीय पोलीस अधिकारी मिळणार आहे. श्री राजा शेरसिंग पवार हे लवकरच राजुरा उपविभागाची सूत्रे स्वीकारणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सध्या कोरपना विभागातील श्री सुशिलकुमार नायक प्रभारी म्हणून राजुरा उपविभागाचा कार्यभार सांभाळीत आहेल .