वरोरा:- वरोरा तालुक्यातील मठाला गावाच्या परिसरात अनेक दगडाच्या खाणी आहेत. परिसरातील मंदिर व टेकड्यांचे महत्त्व अबाधित राहावे, याकरिता सदर परिसरात उत्खनन करण्यास पुरातन विभागाने बंदी घातली आहे. प्रशासनाची नजर चुकवून दगड काढण्याचे काम सुरू असल्याचे समजते. अघन रामचरण कोसले (५५) हा सकाळी शौचालयासाठी गेला असता खदानीत पडून त्याचा मृत्यू झाला. शेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.