चंद्रपूर:- कालिदास सीताराम धांडे (27) रा. शेणगाव आज विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
शेणगाव येथील शेतात कंपनीचे टॉवर लागल्याने त्या जागेवर हा इसम लॉयडस मेटल कंपनीत कामावर लागला होता.
मागील 7 वर्षा पासून तो कंपनीत काम करीत होता.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठवीला आहे. घुग्गुस पोलीस स्टेशन येथे मार्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.