पोलिसांनी सावधगिरी बाळगून आरोपीला घेतले ताब्यात.
चंद्रपूर:- शहरातील माता मंदिर परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिस धाड टाकण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर सत्तुर उगारल्याची घटना घडली. हा प्रकार बघता पोलिसांनी सावधगिरी बाळगून आरोपीला अटक केली. आकाश महादेव खंडाळकर वय 30 शिवाजीनगर असे आरोपीचे नाव असून हा माता मंदिर परिसरात अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली त्याआधारे पोलिसांनी सापडा रुसून आरोपीला पकडण्यासाठी गेले असता, आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की करून समोर असलेल्या केशव चीटगिरे या शिपायावर सत्तुर उगारला त्याच वेळेस उपस्थित पोलिसांनी सावधगिरी बाळगून आरोपीला ताब्यात घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व त्याच्या जवळ असलेला दारूसाठा जप्त केला.