Top News

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- कढोली गावातील बाबुराव चापडे यांच्या बैलावर वाघाने हल्ला केला. सावली तालुक्यातील 25 किमी अंतरावर असलेल्या कढोली गावातील चापडे यांचा बैल चरायला गेल्यानंतर संध्याकाळी घरी आला नाही. व काल रात्रौच्या सुमारासच वाघाने बैलावर हल्ला करून ठार केले होते. ही घटना काल रात्रो 8 वाजताच्या सुमारास गिरीधर भांडेकर यांच्या शेतामध्ये घडली. बैल घरी परत न आल्यामुळे शोधशोध केली असता सकाळी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना झाली. त्यामुळे या अचानक झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक फटका बसला आहे. आता प्रत्येक गावामध्ये धान चूरने चालू आहेत. त्यामुळे त्यांचा एक बैल अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यात मरण पावल्यामुळे नवीन बैल घेण्यासाठी त्यांना सध्या परिस्थितीत आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे वनविभागाने तात्काळ चापडे यांना आर्थिक नुकसान भरपाई मंजूर करून त्यांना सुपूर्द करावी ही गावकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने