Top News

गोंडपिपरी तालुक्यात पसरले वाळू माफियांचे साम्राज्य.

तहसीलदारांची वाळू माफियावर कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील परिसर नदी आणि नाल्याने व्यापलेला असून या परिसरातील रेतीला उच्च दर्जाची मागणी आहे. त्यामुळे या तालुक्यातील नवीन चेहरे झटपट श्रीमंत होण्याकरिता अवैद्य धंद्याकडे वळले आहेत.
सध्या राज्यात रेती घाटाचे लिलाव न झाल्यामुळे गोंडपिपरी तालुक्यात चंद्रपूर आणि राजुरा येथील वाळू माफिया पोकलॅण्ड द्वारे वाळू उपसा सुरू आहे. याचेच एक उदाहरण गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा रेती घाटावर पाहायला मिळाला. 

   गोंडपिपरी तहसीलचे तहसीलदार यांना सोमवारच्या पहाटेला सकाळी साडेतीन वाजता अशी माहिती मिळाली की हिवरा रेती घाटावर पोकलँड द्वारे उत्पन्न सुरू आहे. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता तहसीलदार यांनी घाटावर पाहणी केली असता, पोकलँड द्वारे उत्खनन सुरू होते. त्याचप्रमाणे अंदाजे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर दहा चाकी हायवा ट्रक पण उभे होते. हे सर्व वाहने जप्त करून धाबा पोलीस स्टेशन येथेच जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैद्य वाळू माफियाचे सध्यातरी धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अवैध रेती, मुरूम उत्खननावर आळा घालण्यासाठी मायनिंग टीमचे नियोजन करण्यात आलेले आहे परंतु मायनिंग ऑफिसर कारवाईच्या दृष्टिकोनातून बाहेर निघताच यांची खबर वाळू माफियांना कशी काय लागते? यामुळे याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये होऊ लागलेली आहे. काही कर्मचारी यांचे वाळूमाफियांची संबंध तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने