आमटे परिवाराची अनुपस्थिती.
चंद्रपूर:- रविवारी सकाळी करजगी परिवारातर्फे आयोजित श्रद्धा वन समाधीस्थळावर डॉक्टर शीतल आमटे करजगी यांच्या समाधीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी करजगी आप्त परिवारातील सदस्य समाधी स्थळी उपस्थित होते.
समाधीस्थळी आलेल्या मित्र परिवारातर्फे शीतल आमटे करजगीयांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मित्र परिवाराकडून भावपूर्ण मनोगत व्यक्त करण्यात आले. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर शीतल आमटे यांच्या विदेशातल्या मित्रपरिवाराने श्रद्धांजली अर्पण केली. मात्र आमटे परिवारातर्फे समाधीस्थळी कोणीही उपस्थित न राहिल्याने चर्चेला उधाण आले होते. यावेळी आमटे परिवारातर्फे डॉक्टर मृणाल काळे यांनी विकास आमटे यांचे पत्र संदेश वाचून दाखविला.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर करजगी परिवारातर्फे मौन साधण्यात आले.यानंतर करजगी परिवार आनंदवन येथून पुणे येथे रवाना होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र आनंदवन चा कार्यभार कसा सुरू राहील? यावर ते बोलले नाहीत. डॉक्टर शितल च्या अचानक जाण्यामुळे आनंदवन परिवाराचे फार मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.यापुढे डॉक्टर शीतल चे कार्य आणि विचार पुढे नेण्याचे काम आनंदवन करेल असे विचार यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.
डॉक्टर शीतल आमटे करजगी मित्रपरिवारातील डॉक्टर सागर वझे, प्राध्यापक मृणाल काळे, रवींद्र नल गट्टीवार, माधवी कद्रेकर, अमृता कुलकर्णी, डॉक्टर सुहास पोतदार, अनिल हेब्बर, संतोष गर्जे, हर्षदा पोतदार, डॉक्टर मुनाल काळे, सुजाता देशमुख, झूम द्वारे- लूसियन टर्णिवस्की, सुभाष करजगी, शिरीष करजगी सह परिवारातील मित्र व नातेवाईक यावेळी समाधीस्थळी उपस्थित होते.