Top News

पोंभुर्णा कांग्रेस पक्षाचा कारभार "बॅकफुटवर" राष्ट्रवादीची "सरशी".

वडेट्टीवारांच्या जन्मदिनाला कार्यकर्त्यांचा नकार; पवारांचा जन्मदिन "हॉऊसफुल".
Bhairav Diwase.    Dec 14, 2020
पोंभुर्णा:- महाराष्ट्राच्या राजकारणातला "मास्टरमाईंड" शरदचंद्र पवार यांचा जन्मदिन महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात व अनेक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. त्याच दिवशी बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही वाढदिवस संपूर्ण जिल्हाभर अनेक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. परंतु पोंभुर्णा तालुक्यात जर बघीतले तर एवढा मोठा कांग्रेस सारखा राजकीय पक्ष विस्तारलेला असतांना तरीही पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या जन्मदिनी पोंभुर्णा तालुक्यात घेतलेल्या रक्तदान शिबीराला तालुका प्रमुख पदावरुन राजकीय वादळात सापडलेल्या पदाधिकाऱ्यांनी व या राजकीय वादळाच्या संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क पालकमंत्री वडेट्टीवार यांचा वाढदिवस नाकारत रक्तदान शिबीर कार्यकमाला दांडी मारली. तर एकीकडे पोंभुर्णा तालुक्यात मोठे संघटन नसतांना सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणातला "मास्टरमाईंड" शरदचंद्र पवार यांच्या जन्मदिनी पोंभुर्णा शहरात आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. यावरुन असे स्पष्ट होते की पोंभुर्णा कांग्रेस च्या राजकारणात काहीतरी राजकीय वादळ खदखद आहे.


        काहीच दिवसावर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. पोंभुर्णा तालुक्यात सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. असे असतांना कांग्रेस पक्षातील अंतर्गत कलहामुळे पालमंत्र्यांच्या वाढदिवसाला दांडी मारणारे पदाधिकारी सक्षमपणे निवडणूक लढविण्यास पुढे येतील काय ? असा प्रश्न तालुक्यातील कांग्रेस कार्यकर्त्यात पडला आहे. पोंभुर्णा तालुक्यात तालुका अध्यक्ष पदावरुन दोन गटात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तत्कालीन तालुका अध्यक्ष पद्मगिरीवार यांच्याकडे जवळपास दहा वर्षे तालुका अध्यक्ष पदाची धुरा होती. यांच्या कारकिर्दीत मात्र तालुक्यात कांग्रेस पक्षाचे संघटन "बॅकफुटवर" जाऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपा कार्यकर्त्यांच्या ताब्यात गेल्या. त्यात पोंभुर्णा नगरपंचायत मध्ये सुद्धा तत्कालीन अध्यक्षाला निवडणूक रिंगणात हार मानावी लागली आणी मागच्या दाराने स्विकृत सद्सस्यता स्विकारावी लागली. गेली दहा वर्षाचा तत्कालीन अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार यांचा कारभार पाहता पक्षसंघटन वाढीस मारक ठरला. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यात कांगेस पक्षाला नवी झळाळी यावी व पक्ष संघटन मजबूत होऊन पक्ष मोठा व्हावा या उद्दात हेतूने पक्ष श्रेष्ठींनी जेष्ठांना संधी देत कवडूजी कुंदावार यांचेकडे तालुका अध्यक्षाची धुरा दिली. त्यामुळे याच बदलातून पोंभुर्णा तालुका कांग्रेस पक्षाला खिळ बसली.
        

         तत्कालीन कांग्रेस तालुका अध्यक्ष पद्मगिरीवार यांनी आपला हेका कायम ठेवत सातत्याने पक्ष विरोधात जाऊन नव्या अध्यक्षाविरोधात कारवाया करीत आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना मोठा संभ्रम पडला आहे. तर यांचा मोठा फायदा घेत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय ढोंगे यांनी तालुक्यात मोठी राजकीय भुमिका घेऊन सतत कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भेटून पक्ष संघटध वाढवित आहेत. कांग्रेस पक्षाचे अनेक नाराज कार्यकर्ते राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांच्या संपर्कात आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठी पसंती मिळत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत. गेल्या पंधरा वर्षाच्या अगोदर पोंभुर्णा तालुका राष्ट्रवादी पक्षाचा गड ठरला होता. त्यावेळेस पोंभुर्णा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवल्या गेला व जिल्हा परिषद सदस्य म्हणून कांग्रेसमधील आत्ताचे कार्यकर्ते विनोद अहिरकर राष्ट्रवादी च्या पक्ष टिकीटावर निवडून आले होते. आत्ताही तिच परिस्थिती तालुक्यात निर्माण होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कांग्रेस पक्षाला "बॅकफुटवर" च रहावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने