फासे पलटले, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादमध्ये भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर.

GHMC Election Results 2020.

Bhairav Diwase. Dec 04, 2020
हैदराबाद:- हैदराबादमध्ये झालेल्या महानगर पालिका निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 30 मतमोजणी केंद्रावरील निकाली हाती आला असून त्यामध्ये फासे पलटल्याचे पाहायला मिळाली. TRS आणि MIM ला टफ फाइट देऊन भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर असल्याचं आताच्या हाती आलेल्या कलमधून दिसत आहे. अंतिम निकाल येणं अद्याप बाकी असल्यानं सर्वांचं लक्ष त्याकडे लागलं आहे.

शुक्रावारी 10.30 वाजेपर्यंत दुसरा कल हाती आला आहे.

BJP 85 जागांवर आघाडी

TRS- 29 जागांवर आघाडी

AIMIM 17 जागांवर आघाडी

INC 02​​​ जागांवर आघाडी

GHMC Elections results 2020 (ग्रेटर हैदराबाद महानगर पालिका) चा 10.30 वाजेपर्यंतचा दुसरा कल हाती आला आहे. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 85 जागांवर आघाडी घेतली आहे.

TRS 29 जागांवर पुढे आहे. बॅलेट पेपरच्या मतमोजणीमध्ये भाजप आघाडीवर आहे. आता या निवडणुकीमध्ये कोणाचा वर्चस्व ठऱणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


2016च्या निवडणुकीत भाजप 4 टीआरएस 3 तर एमआयएमने 44 जागावर विजय मिळवला होता. त्यामुळे आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि काँटे की टक्कर असणार आहे. या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलणार का आणि एमआयएमला टक्कर देण्यात यशस्वी ठरणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने