ओबीसींनी प्रवाहात येऊन लढा लढणे गरजेचे :- डॉ. समीर कदम

Bhairav Diwase
राजुरा येथे ओबीसी प्रबोधन शिबिर संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दिनांक २६-१२-२०२० ला राजुरा येथे ओबीसी प्रबोधन शिबीर संपन्न झाले. ओबीसींनी प्रवाहात येऊन लढणे गरजेचे आहे ओबीसींवर होत असलेल्या अन्याया विरोधात लढण्यासाठी युवकांनी मैदानात उतरावे असे प्रतिपादन डॉ समीर कदम यांनी केले.
  
       विदर्भातील जास्तीत जास्त शेतकरी हा ओबीसी आहे आणि ओबीसीं सोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी युवकांनी लढणे गरजेचे आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर डोहे बोलत होते.
             
       तळागाळातील ओबीसींच्या जागृती साठी प्रबोधन शिबिर घेण्याचे काम राजुऱ्यातील युवक सातत्याने करीत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून राजुऱ्यात प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संतोष भाऊ देरकर, सुभाष अडवे सर, उत्पल भाऊ गोरे, आशिष भाऊ करमरकर, केतन भाऊ जुनघरे कु .श्रुती मोहितकर उपस्थित होते.
                 
     शिबिराच्या यशस्वीतेसाठी भूषन रागीट, चेतन सातपुते, प्रजवल उराडे, प्रज्वल ढवस, सुमित पायपरे, वैभव अडवे, प्रणव बोबडे, निलेश बोन्सुले, अंकुश मसकी, करणं झाडे, वैभव गलफडे, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज गव्हाणे, संचालन विशाल शेंडे, तर आभार सुजित कावळे यांनी मांडले.