चंद्रपूर:- मंगळवार दिनांक ८/१२/२०२० ला संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या (३९६ व्या जयंती ) जन्मोत्सव निम्मित रक्तदान शिबीराचे आयोजन करुन साजरी करण्यात आले. या जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
विदर्भ तेली समाज महासंघ शाखा घुग्घुस च्या वतीने गांधी चौक घुग्घुस येथे पुरुष व महिला आणि जेष्ठ नागरिक उपस्थितो झाले होते. संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सव हा श्री संताजी महाराजांच्या प्रतीमेची पुजा व ज्योत प्रज्वल जेष्ठ नागरिक याचे हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये मध्ये पुरुष व महिला सहभागी होऊन रक्तदान करण्यास सहकार्य केले.