चंद्रपूर:- लॉकडाऊननंतर प्रथमच आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये आपल्या केसेस समझोत्याने मिटवून झटपट निर्णय प्राप्त करण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे. मान. राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्हयामध्ये येत्या १२ डिसेंबर, रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे. झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य.
लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो. व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामाएवढेच महत्व असते व त्याची अंमलबजावणी सुध्दा करता येते. त्याव्दारे वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वच पक्षांना जिंकल्याचे मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी वेगळा शुल्क खर्च लागत नाही. जे पक्षकार लोकन्यायालयदिवशी न्यायालयात समक्ष हजर राहू शकणार नाहीत त्यांना व्हाटसअप कॉलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे वरच्युअली उपस्थित राहण्याची सुविधा सुध्दा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यातील लोक अदालत होऊ शकल्या नाहीत. आता लॉकडाऊननंतर प्रथमच दहा महिन्यांनी ही राष्ट्रीय लोक अदालत आहे. त्यात सहभागी होऊन आपले प्रकरण विहित सोप्या प्रक्रियेव्दारे निकाली करून घेऊन वरील नमूद फायदे मिळवण्याची नामी संधी पक्षकरांना मोफत उपलब्ध झालेली आहे . त्याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्याव्दारे करण्यात येत आहे.
समाधान कामगार वाद तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी फौजदारी एन . आय . अॅक्ट (धनादेश न वटणे ) बँकांची कर्ज वसूली वगैरे प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कायदा याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद. इलेक्ट्रीसिटी अॅक्टची समझोतायोग्य न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटीगेशन) प्रकरणे महसुल, पाणीपट्टी वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन मान. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती कविता बि. अग्रवाल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबधीत न्यायालयात किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण, नागभिड येथे स्वत: येऊन किंवा हेल्पलाईन फोन नंबर ०७१७९ -२४०४५२, तसेच श्री. धारगावे, लिपीक ( मोबाईल नंबर ९३५९५१२०४६) श्री . पुराम क.लिपीक ( मो . नं. ९६३७८०७५२३), वर संपर्क करावा.