शेतकऱ्यांचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील राजोली फाल-1 नंबर येथील शेतकरी अंबादास बाजीराव कोवे यांचे दोन एकर शेतातील धानाच्या पुंजन्याला आज दि. 8 रोजी 2 वाजताचे दरम्यान अचानक आग लागून अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले.
सदर आग आकस्मिकपणे लागली असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणाची कार्यवाही बोथली येथील तलाठी करीत आहेत. पहिलेच शेतकरी उत्पादन कमी होत असल्यामुळे त्रस्त असून अशा अचानक लागलेल्या आगीमुळे चिंतातुर झालेला आहे. त्यामुळे संबधित शेतकर्यांनी नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.