माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भाजपाचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मागणी.
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यात चीचगाव-डोर्ली परीसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांत बिबट्याच्या हल्यात 2 लोकांना ठार केले. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत घरा बाहेर पडायला लोक घाबरत आहेत. या पुढे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये या करीता सदर बिबट्याला जेरबंद करण्याची भाजपाच्या वतीने करण्यात आली.
एकाच आठवड्यात परिसरातील बिबट्याने २ लोकांना ठार केले. सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरातील लोकांनी ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची भेट घेतली. या मागणीला प्रतिसाद देत माजी प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भाजपाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. या बाबत ब्रम्हपुरी येथील वन अधिकारी श्री. म्हालोत्रा यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपा जिल्हा महामंत्री तथा जि.प सदस्य क्रिष्णा सहारे, पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाकडर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गोकुल बालपांडे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, जिल्हा सचिव तथा जि.प सदस्या दीपाली मेश्राम, पं. स सदस्य नीलकंठ मानापुरे, भाजपा ब्रम्हपुरी शहर कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी पं. स सभापती रवींद्र मेश्राम, भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदेवें, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, ललित उरकुडे, अक्षय चहांदे, लोमेश मेश्राम, विलास वाकुडकर, रेवनाथ ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.