जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला:- आ. सुधीर मुनगंटीवार
मुल:- तालुक्यातिल गोंड़पिपरी- खेडी मार्गावरिल खेड़ी जवळ डॉ तुषार मारलावार यांचा शेतासमोर आज रात्रो 7. वाजता च्या दरम्यान दुचाकी ने अपघात झाला त्यात कांग्रेसचे नेते, बाजार समिति चे संचालक, मूल पंचायत समिती चे सदस्य, संजय गांधी निराधार योजना चे तालुका अध्यक्ष संजयभाऊ मारकवार हे गंभीर जखमी झालेले होते त्यांना चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता त्यांचा मृत्यु झाला.मृत्यु ची बातमी ही परिसरात कळताच अनेकांना धक्का बसला.त्यांचा मृत्यु ने परिसरात शोककळा पसरली असून अपघात कसा झाला हे अजूनही अस्पष्ठ आहे. या प्रकारणा चा तपास सावली पोलिस करणार आहे.
जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला:- आ. सुधीर मुनगंटीवार
मुल पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील मारकवार यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला अशा शब्दात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक , पंचायत समितीचे सदस्य या पदांच्या माध्यमातून संजय पाटील मारकवार यांनी गेली अनेक वर्षे जनतेची सेवा केली. सहृदय मित्र , कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांना देवो असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.