Top News

भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळात पोहचवत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना चारीखानी चित करा:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे.

कोरपना येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.
Bhairav Diwase. Dec 28, 2020
कोरपना:- होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज कोरपना येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. 
या बैठकीला भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


       यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, सद्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा एकछत्री कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे गावागावात कार्यकर्त्यांत मोर्चेबांधणीला मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली आपण पाहतो आहोत, परंतु यात विशेष म्हणजे आपल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा पूर्ण शक्तिनिशी आज या निवडणूकीच्या रणसंग्रामात उतरून संघटनवाढीसाठी कार्य करताना दिसतो आहे, ही बाब खरचं कौतुकास्पद आहे. त्यामुळे कोरपना तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सुद्धा या निवडणुकीत प्रत्येक ग्रामपंचायतीवर भाजपचाचं विजयी ध्वज फडकेल यादृष्टिने आपली रणनीती आखली पाहिजे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे योग्‍य नियोजन करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे. हे अत्यावश्‍यक आहे. त्यातूनच आपल्याला विजयाला गवसणी घालता येईल. आजपर्यंत या भागामध्ये भाजपाच्या माध्‍यमातुन किंवा आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन असेल झालेल्या प्रत्येक विकासकामाचा पाढा आपण जनतेसमोर वाचला पाहिजे. 
आज आपल्याला शीर्षस्थानी आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, आदरणीय हंसराजभैय्या अहीर यांच्या सारख्या नेतृत्वाची खंबीर साथ व मार्गदर्शन तर कार्यक्षम जिल्हाध्यक्ष म्हणून देवराव दादा भोंगळे यांचे दमदार सहकार्य आपल्याला वेळोवेळी भेटते आहे. 

      त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आपण विरोधकांना दाखवून दिली पाहिजे. एकजुटीने काम करत आपला विचार तळागाळापर्यंत पोहचवत होणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना चारीखानी चित करा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले.
यावेळी बैठकीला नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक अमोल आसेकर, विजय पानघाटे, सुधाकर मोडक, अॅड. पवन मोहितकर, अभय डोहे, सचिन डाखरे, सुभाष आत्राम, विवेक पारखी, कुनाल ठावरी, साहिल लांडगे, प्रजोत आवारी, जितेंद्र पिंपळकर, गणेश तुमराम, यांसह भाजयुमोचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने